आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन‎:राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त‎ बांधकाम कामगारांना मार्गदर्शन‎

नगर‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त‎ बुरुडगाव रोडवरील ‘स्कायब्रिज’ येथे‎ बांधकाम कामगारांना सुरक्षा‎ उपाययोजनांबाबत मार्गदर्शन‎ करण्यात आले. बांधकाम क्षेत्रात‎ आता खूप बदल झाले आहेत.‎ नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला‎ असला, तरी ते वापरणारे कामगार‎ महत्वाचे आहेत.‎ प्रत्येकाने अतिशय काळजीपूर्वक सर्व‎ सुरक्षा साधने परिधान केली पाहिजे.‎

एखादी दुर्घटना घडल्यास‎ प्रथमोपचाराची प्राथमिक माहिती‎ ठेवली पाहिजे. सरकारच्या बांधकाम‎ कामगारांसाठी आरोग्य तसेच विमा‎ विषयक योजना आहेत. त्याचीही‎ माहिती व‌ लाभ कसा मिळवावा याची‎ माहिती यावेळी देण्यात आली. सुरक्षा‎ सप्ताह हा वर्षभर लक्षात ठेऊन काम‎ केल्यास अपघात टळून कुटुंबही‎ आनंदी ठेवावे, असे आवाहन या‎ वेळी करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...