आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी दिनाचे आयोजन:चिंचपुरला सोयाबीन पीकावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन ; बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्राचा उपक्रम

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर मार्फत तेलबीया समुह पथदर्शक प्रात्यक्षिकांतर्गत संगननेर तालुक्यातील चिंचपुर येथे सोयाबीन पिकांवर माहिती देण्यासाठी कृषी दिनाचे आयोजन केले होते. यावेळी तज्ञांनी चिंचपूर गावामध्ये प्रात्यक्षिक प्लॉटवर प्रत्यक्ष भेट देवून पीक उत्पादनातील विविध बाबींवर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी पद्मश्री डाॅ. विखे पाटील कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कैलास नाना तांबे, प्रगतशील शेतकरी शंकर रामभाऊ तांबे, लक्ष्मण दादा तांबे, लक्ष्मण ठकाजी तांबे, गणपत लक्ष्मण तांबे आणि सोयाबीन उत्पादक यांच्यासह केंद्राचे प्रमूख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, कृषिविद्या विभाग प्रमुख शैलेश देशमुख, पीक संरक्षण विभाग प्रमुख भरत दवंगे आणि मृद विज्ञान विभाग प्रमुख शांताराम सोनवणे उपस्थित होते. सोयाबीन पिकांवर सध्या विषाणू रोगाचा प्रादूर्भाव वाढू नये, याबाबत घ्यावयाच्या उपाययोजनांविषयी भरत दवंगे यांनी माहिती दिली. उसावरील हुमणी किडी विषयी शेतकर्यांना जागृत राहावे असे आवाहन केले. तर सोयाबीन बिजोत्पादन, बिजप्रक्रिया आणि तणनाशकांचा वापर या विषयी शैलेश देशमुख यांनी माहिती दिली. शांताराम सोनवणे यांनी सोयाबीनमध्ये संतुलित पीक पोषणविषयी शेतकऱ्यांना अवगत केले.कृषी दिनाचे औचित्य साधुन केंद्राचे प्रमुख शास्ञज्ञ डाॅ. संभाजी नालकर यांनी सोयाबीन पीक व्यवस्थेबरोबरच पशुपालनामधील लम्पी रोगाविषयी वेळीच उपाययोजना करण्याचे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले. यावेळी सोयाबीन, ऊस, मका तसेच पशुपालनांमधील शेतकऱ्यांच्या विविध शंकाचे केंद्राच्या शास्त्रज्ञांनी निरसन केले.

उत्पादनात वाढ हाेते
भारतीय कृषि अनुसंधान केंद्र, नवी दिल्ली, अटारी, पुणे यांच्या वतीने दरवर्षी तेलबीया समुह पथदर्शक प्रात्यक्षिकांतर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष विविध तंञज्ञानातून नव्या तंञाचे ज्ञान दिले जाते. यामुळे प्रत्यक्ष कृतीतून उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते, असे लाभार्थी शेतकरी सांगतात.

बातम्या आणखी आहेत...