आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेला ऐतिहासिक विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या योजनांचे आणि विकास प्रक्रियेचे यश असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर गुजरातच्या जनतेन विश्वास ठेवून या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. ज्या गुजरात राज्यातून मोदी यांनी विकासाचे माॅडेल जनतेसमोर आणले, त्याच ध्येयाने संपूर्ण देशात विकासाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून गरीब कल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. त्यामुळेच जनतेचा विश्वास सरकारच्या कार्यप्रणालीवर असल्याचे या निकालातून स्पष्ट झाल्याचे विखे म्हणाले. आज जगात विकासात्मक देश म्हणून भारताची प्रतिमा उंचावत असल्याने जी-२० परिषदेचे मोदींकडे आलेले अध्यक्षपद हे या विकास प्रक्रियेचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. सामान्य माणसाचा जनाधार जपच्या पाठीशी असल्याचे या निकालातून स्पष्ट झाल्याचे सांगितले.
गुजरातच्या जनतेन ५५ टक्क्यांच्या पुढे भाजपाला दिलेले ऐतिहासिक मतदान हे सरकार आणि पक्षावर दाखवलेल्या विश्वासच प्रतिक असल्याचे विखे म्हणाले. काॅग्रेस नेते राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेचा कोणाताही परिणाम या निवडणुकीवर झाला नसल्याकडे माध्यमांचे लक्ष वेधून विखे यांनी सांगितले की एकहाती सता मिळविणार्या या पक्षाकडे नेतृत्वाचा अभाव आहे. काँग्रेस पक्षाने आता मोदींचे नेतृत्व मान्य करून भारताशी जोडून घ्यावे असा सल्ला त्यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.