आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणे कुटुंबावर घणाघात:ज्यावेळी आम्ही राणेंच्या पाठीशी होतो त्यावेळी त्यांची पोरं बनियनवर होते, गुलाबराव पाटीलांचे नितेश राणे यांना प्रत्युत्तर

अहमदनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता नारायण राणेंना मी वाईट कसा वाटायला लागलो, गुलाबराव पाटलांचा सवाल

गुलाबराव पाटील कुणावर बोलतात? नारायण राणे यांची उंची किती? ते शुद्धीवर किती तास असतात?, अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपचे खासदार नारायण राणे ज्यावेळी शिवसेनेत होते तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी होतो. त्यावेळी त्यांचे पोरं बनियनवर होते, त्यामुळे त्यांनी मला शिकवू नये, असा हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गुलाबराव पाटील अहमदनगरला आले होते, त्यावेळी त्यांनी राणे कुटुंबावर घणाघात केला.

आता नारायण राणेंना मी वाईट कसा वाटायला लागलो, गुलाबराव पाटलांचा सवाल

नारायण राणे शिवसेनेत असताना आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे होतो, तेव्हा नारायण राणे फायटर बटालियनमध्ये माझे नाव घ्यायचे. आता नारायण राणेंना मी वाईट कसा वाटायला लागलो? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी विचारला. छत्तीस वर्षांपासून मी शिवसेनेत काम करतोय. त्यामुळे त्यांनी आम्हाला धमक्या देऊ नये. मी निष्ठावंत असून गद्दारांच्या यादीत माझे नाव नाही, अशी टीका देखील त्यांनी राणेंवर साधला.

बातम्या आणखी आहेत...