आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुरुकुल महिला मंडळाकडून दरवर्षी कर्तुत्ववान महिलेस देण्यात येणारा ‘गुरुकुल कृतज्ञता पुरस्कार’सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व मणगाव प्रकल्पाच्या संस्थापिका डॉ. सुचेता धामणे यांना रविवार (12 मार्च)ला जाहीर करण्यात आला आहे. 25 हजार रुपये रोख, मानाची साडीचोळी आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्काराबद्दल माहिती देताना गुरुकुल महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री झरेकर म्हणाल्या, डॉ. सुचेता राजेंद्र धामणे या माऊली प्रतिष्ठानच्या संस्थापक आहेत. बेघर, बेवारस, मनोरुग्ण व गंभीर आजारी असलेल्या महिलांच्या त्या आधारवड ठरल्या आहेत. या महिलांच्या 39 मुलांना व सुमारे 450 महिलांना उपचार व निवारा देण्यासाठी त्यांनी मनगाव प्रकल्पाची निर्मिती केली आहे. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील कम्युनिटी मेडिसिन या विषयातील व्याख्याती हे पद सोडून त्यांनी पूर्णवेळ अशा महिलांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले आहे.
आपले पती डॉ. राजेंद्र धामणे यांच्या मदतीने डॉ. सुचेता धामणे यांनी मानसिक व शारीरिक आजार नियंत्रणात आणलेल्या माता- भगिनिंच्या स्वयंपुर्णतेसाठी विविध उद्योग व्यवसायाची निर्मिती केली आहे. अशा कामाने त्यांनी समस्त स्री वर्गाला एका वेगळ्या उंचीवर नेहून ठेवले आहे. म्हणुनच महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही हा कृतज्ञता पुरस्कार’ जाहीर करत आहोत.
या पुरस्कारांबरोबर जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षिकेंना गुरुकुल स्री सन्मान पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. 19 मार्चला मान्यवरांच्या हस्ते या सर्व पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती गुरुकुलच्या सुनिता काटकर, कल्पना बाविस्कर, वैशाली हासे, स्मिता रसाळ, मीनाक्षी काकडे, शुभांगी ईश्वरे, जयश्री घोडेकर, कमरुन्निसा शेख, अंजली महामेर, स्वाती गोरे, सुशीला धुमाळ, मंगल गोपाळे, जया कुलथे, ज्योती शिरोळे, मिना साबळे, कमाल आंबेकर,छाया तुपे, कल्पना वाघ, सुनिता ठाणगे, शिल्पा साखरे, शुभांगी पवार, अनुराधा फुंदे, सुलोचना कुळधरण, कविता नरसाळे, संगीता ठाणगे, शैला जाधव, उज्ज्वला वासाल, मंजुषा नवले यांनी दिली आहे.
मन आणि घर हरवलेल्या भगिनींना दिली सावली
मन आणि घर हरवलेल्या भगिनींना 'मनगाव ' ने सावली दिली आहे . या प्रकल्पाच्या संस्थापिका डॉ .सुचेता राजेंद्र धामणे यांचे कार्य पाहून गहिवरून येते . 'मानवता ' म्हणजे काय याचा प्रत्यय ' मनगाव ' पाहून येतो. या पुरस्काराच्या निमित्ताने ' मनगाव ' मधील माणूसकीचा धडा शिक्षणक्षेत्रातील घटकांना माहित होईल . असे साहित्यिक व शिक्षक नेते डॉ . संजय कळमकर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.