आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:गुटख्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीगेट परिसरातून जप्त करण्यात आलेल्या १० लाखाचा गुटखा प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तोफखाना हद्दीत गुटखा पकडल्यानंतर सुरूवातीला कोतवाली पोलिसांकडे हा तपास देण्यात आला होता. आता पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे तो तपास वर्ग करण्यात आला आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या पथकाने तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून १० लाखांचा गुटखा पकडला.

याप्रकरणी हरिश खेमकरण खंडोजा (वय ३६, रा. प्रवरानगर ता. राहाता), दीपक पोपट यादव (वय ३९, रा. ग्राम्हणगल्ली माळीवाडा) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुटख्यासह एकूण १७ लाख १४ हजार ५१२ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, या गुन्ह्याचा तपास कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यामुुळे चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...