आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरराज्यातून येणाऱ्या खासगी बस तसेच रेल्वेतून नगरमध्ये काेट्यवधी रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू दाखल हाेतो. शहरातील अाठ ते दहा माेठे डिलर या गुटखा-तंबाखूचे जिल्हाभर वितरण करतात. लहान-माेठ्या टपऱ्यांवर त्याची खुलेअाम विक्री सुरू अाहे. केवळ जुजबी कारवाई करून या अवैध विक्रीला पुन्हा पाठबळ देण्याचे काम पाेलिस अाणि अन्न-अाैषध विभाग करत अाहे. गुटखा-सुगंधी तंबाखू जिल्ह्यात येते कशी? याचा शाेध मात्र पाेलिसांना अद्याप लागलेला नाही.
नगर शहर विभागाचे पाेलिस उपाधीक्षक विशाल ढुमे यांनी शुक्रवारी पहाटे तब्बल अाठ लाख रुपयांचा १६ पाेती गुटखा जप्त केला. असिफ शेख सिकंदर व जावेद शेख निसार या दाेघांना मुद्देमालासह अटक करण्यात अाली. केडगाव उपनगरातील परिसरात शुक्रवारी पहाटे दाेनच्या सुमारास ही कारवाइ करण्यात अाली. दरम्यान, या जुजबी कारवाईनंतरही शहरासह जिल्हाभर खुलेअाम गुटखा व सुगंधी तंबाखूची विक्री सुरू अाहे. मुळात हा गुटखा व तंबाखू शहर व जिल्ह्यात येते काेठून याचा शाेध घेण्याचे प्रयत्न अद्याप पाेलिसांकडून झालेले नाहीत. शहरात अाठ ते दहा माेठे डिलर या अवैध धंद्यात अाहेत. पाेलिसांशी त्यांचे लागेबांधे असल्याची चर्चा अाहे.
शहरातील मुकुंदनगर, ग्रामिण भागातील शेवगाव, श्रीरामपूर अादी भागात सुगंधी तंबाखू वापरून मावा तयार करण्याचे माेठे कारखाने अाहेत. दाेन वर्षापूर्वी या कारखान्यांवर पाेलिसांनी धाडी देखील टाकल्या हाेत्या. मात्र, त्यानंतर एकही कारवाई झाली नाही. त्याचबराेबर याप्रकरणात गुंतलेल्या काही पाेलिस अधिकारी व कमचाऱ्यांना निलंबित देखील करण्यात अाले हाेते. पाेलिस उपाधीक्षक ढुमे यांनी शुक्रवारी केलेल्या गुटखा जप्तीच्या कारवाईतून शहर व जिल्ह्यात विक्री हाेत असलेल्या गुटखा- सुगंधी तंबाखूचा प्रश्न पुन्हा एेरणीवर अाला.
पाेलिसांची कारवाई संशयास्पद
शहर व िजल्ह्यात गुटखा व सुगंधी तंबाखूचे माेठे रॅकेट कार्यरत अाहे. काेट्यवधी रुपयांची उलाढाल या अवैध धंद्यातून सुरू अाहे. त्यात पाेलिसांचे लागेबांधे अाहेत. यापूर्वी सुगंधी तंबाखूच्या प्रकरणातून काही पाेलिस अधिकारी व कमचारी निलंबित झालेले अाहेत. असे असले तरी या धंद्याला अद्याप लगाम लागलेला नाही. शुक्रवारी लाखाे रुपयांचा गुटखा पकडला तरी त्याची माहिती अन्न व अाैषध विभागाला पाेलिसांनी दिली नाही. हा प्रकार वारंवार घडलेला अाहे. यावरूनच पाेलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे स्पष्ट हाेते.
परराज्यातून येतो गुटखा
मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश अादी राज्यातून माेठ्या प्रमाणात गुटखा अाणि सुगंधी तंबाखू छुप्या पद्धतीने नगर शहरात दाखल हाेते. त्यासाठी माेठी यंत्रणा कार्यरत अाहे. परराज्यातून येणाऱ्या खासगी बस तसेच रेल्वेतून हा गुटखा व तंबाखू शहरात येतो. शहरातील अाठ ते दहा माेठ्या डिलरच्या मागणीनुसार हा गुटखा-तंबाखू शहरात येतो. शहरातून त्याचे वितरण तालुका अाणि गावपातळीवर हाेते. १५ रुपयांपासून ते ६० रुपयांपयंत एका पुडीची िकंमत अाहे. तरुणांसह ज्येष्ठ या गुटख्याच्या अाहारी गेले अाहेत.
कारवाईची माहितीच नाही
गुटखा असाे की सुगंधी तंबाखू, कारवाई करताना अथवा झाल्यावर पाेलिसांनी आम्हाला कळवणे अावश्यक अाहे. केडगाव परिसरात लाखाेंचा गुटखा पकडला. याबाबत पाेलिसांनी अद्याप काेणतीच माहिती दिलेली नाही. अाम्हाला कळवले, तर अाम्ही तत्काळ घटनास्थळी उपस्थित राहताे. परंतु पाेलिस अाम्हाला कळवत नाहीत. अामच्याकडे मनुष्यबळ कमी अाहे, तरी अाम्ही कारवाया करताे. अशी कारवाई करताना पाेलिसांनी अाम्हाला कळवणे अावश्यक अाहे.'' एस. पी. शिंदे, सहायक अायुक्त, अन्न व अाैषध विभाग.
पाेलिसांची उशिराने जुजबी कारवाई
श्रीरामपूर अादी भागात सुगंधी तंबाखू वापरून मावा तयार करण्याचे माेठे कारखाने अाहेत. दाेन वर्षापूर्वी या कारखान्यांवर पाेलिसांनी धाडी देखील टाकल्या हाेत्या. मात्र, त्यानंतर एकही कारवाई झाली नाही. त्याचबराेबर याप्रकरणात गुंतलेल्या काही पाेलिस अधिकारी व कमचाऱ्यांना निलंबित देखील करण्यात अाले हाेते. पाेलिस उपाधीक्षक ढुमे यांनी शुक्रवारी केलेल्या गुटखा जप्तीच्या कारवाईतून शहर व जिल्ह्यात विक्री हाेत असलेल्या गुटखा- सुगंधी तंबाखूचा प्रश्न पुन्हा एेरणीवर अाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.