आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान‎:जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह‎ गारपीट,रब्बी पिकांचे नुकसान‎

नगर‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात‎ शनिवारी अवकाळी व गारपिटीचा पाऊस‎ झाला. त्याचा मोठा फटका रब्बी‎ हंगामातील पिकांना बसला आहे.‎ शनिवारी शहरात दुपारी १ वाजता व‎ सायंकाळी ४ वाजता वादळी वाऱ्यासह‎ गारांचा पाऊस झाला. दरम्यान,‎ अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे‎ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले‎ आहेत. संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी‎ स्वतः नैसर्गिक परिस्थितीत पंचनामे‎ करण्याची तयारी दर्शवली आहे, अशी‎ माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम‎ सालीमठ यांनी दिली.‎ जिल्ह्याच्या दक्षिण भागातील कर्जत,‎ जामखेड, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांत‎ फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत.‎

गारपिटीच्या व वादळी वाऱ्याच्या‎ पावसामुळे फळबागातील संत्री, मोसंबी‎ तसेच आंब्याचा मोहोर गळून पडला‎ आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ महसूल कर्मचारी संपावर असल्यामुळे‎ नुकसानीचे पंचनामे लांबणीवर पडले‎ आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले‎ आहेत. नगर शहरातील बहुतेक‎ रस्त्यावर जून, जुलैतील पावसामुळे खड्डे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कायम असताना या अवकाळी‎ पावसामुळे त्यात भर पडली आहे. त्यामुळे‎ नागरिकांना रस्त्यावरून वाहने‎ चालवताना तारेवरची कसरत करावी‎ लागत आहे.‎

जिल्हाधिकाऱ्यांचे पंचनामे करण्याचे निर्देश‎
अवकाळी पावसामुळे नगर जिल्ह्यात पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत सर्वे करून‎ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महसूल कर्मचारी संपावर असले तरी‎ त्यांनी नैसर्गिक आपत्तीत स्वतःहून पंचनामे करण्याची तयारी दर्शवली आहे. संप‎ कालावधीत आरोग्य सेवा, पाणी व्यवस्था सुरळीत आहे, त्याचा मोठा विषय नाही,‎ असे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...