आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा झाला. संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने या सोहळ्यात अहमदनगरच्या बुऱ्हानगरमधील हालगी पथकाला सादरीकरणाचा विशेष मान मिळाला.
पारंपारिक वाद्य, शस्त्र या लोककला यांचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. युवा पिढीला याची आवड निर्माण व्हावी, म्हणून बुऱ्हानगरचे हलगी पथक कार्यरत आहे. रविवारी रायगड समितीच्या राज्यव्यापी बैठकीला हलगी पथक कार्यकम सादर केला, अशी माहिती रामेश्वर चेमटे यांनी दिली.
नवनाथांचे वाद्य म्हणून हालगी (डफ) प्रसिद्ध आहे. यास हजारो वर्षाची परंपरा असून बुऱ्हानगरमधील चेमटे, कर्डिले, जाधव, भगत, पानसरे, गोरे यांनी ही लोककला जोपासली आहे. ८ ते ८० या वयोगटातील युवक ते वृद्ध यांचा या पथकात समावेश आहे. निम्मे वादक ५५ ते ६० वयोगटातील आहेत. दरवर्षी माळीवाड्यातील विशाल गणपती मिरवणूक, तसेच नाथांच्या यात्रा उत्सवात हालगी पथकाचा सहभाग असतो. तसेच जिल्ह्यातील व राज्यातील विविध यात्रा, कार्यक्रमात बुऱ्हानगरमधील हलगी पथकाने आपली कला सादर केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.