आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि या कायद्याची जाणीवपूर्वक केली जात असलेली बदनामी तात्काळ थांबवावी या मागणीसाठी जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोटारसायकल रॅली काढून मोर्चा काढण्यात आला.
जिल्हा हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.माथाडी महामंडळाचे सहचिटणीस सुभाष लोमटे, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, शेख रज्जाक शेख लाल, सचिव मधुकर केकाण, सहसचिव बाळासाहेब वडागळे, सल्लागार अशोक बाबर, नंदू डहाणे, आशाबाई रोकडे, भैरु कोतकर आदिंसह हमाल-मापाडी, महिला या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम साळीमठ यांना निवेदन देण्यात आले.
काळाच्या कसोटीवरही आदर्श
यावेळी बोलतांना सुभाष लोमटे म्हणाले की, हमाल-मापाडी, स्त्री हमाल कामगार या कष्टकरी घटकांचे अनेक प्रश्न व मागण्या राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडे प्रलंबित आहेत. माथाडी कायदा 1969 साली अस्तित्वात आलेला आहे. हमाल कष्टकर्यांनी लढून मिळविलेला हा कायदा असंघटित कष्टकर्याना सामाजिक सुरक्षा देणारा देशातील पहिला कायदा आहे. काळाच्या कसोटीवरही हा कायदा आदर्श ठरला आहे.असे त्यांनी यावेळी सांगितले.
मजुरी कोणाकडून घ्यायची
अविनाश घुले म्हणाले, स्थानिक माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये आवक वाराईचा प्रश्न 20 वर्षापासून प्रलंबीत आहेत. महिलांचा मजुरीचा प्रश्न प्रलंबीत आहेत, ठोक वाराई भराईचा करार 3 वर्षापासून करार संपलेला आहे.वाढीव मजुरी आद्यापही मिळालेली नाही. व मजुरी कोणाकडून घ्यायची हा प्रश्न प्रलंबित आहे. आस्थापना माथाडी मंडळात नोंदीत करणे आवश्यक असताना लोखंड बाजार विभागातील व फरशी विभागातील आस्थापना नोंदीत नाहीत. असा आरोप त्यांनी केला.
माथाडी मंडळाला कुलूप लावणार
माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि या कायद्याची जाणीवपूर्वक केली जात असलेल्या बदनामी तात्काळ थांबवावी. जिल्ह्यातील हमाल-मापाडी,स्त्री हमाल कामगार या कष्टकरी घटकांचे प्रश्नाची सोडवणूक करण्यात यावी, आदि मागण्या एक महिन्यात मान्य न झाल्यास माथाडी मंडळाला कुलूप लावू,असा इशारा घुले यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.