आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दणका:श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणावर हातोडा; पालिकेने सामान व दुचाकी घेतल्या ताब्यात

श्रीरामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमानामुळे शहराचा श्वास कोंडला जात होता. अखेर मुख्याधिकारी गणेश शिंदे व श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी पुढाकार घेत कर्मचाऱ्यांच्या मदतीने गुरुवारी सायंकाळी कारवाई केली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर सामान व दुचाकीही ताब्यात घेण्यात आल्या. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनेकांची धांदल झाली.

श्रीरामपूर शहरात मेनरोड, शिवाजी रोड, नेवासे रोड, संगमनेर रोड, बेलापूर रोड, गोंधवणी रोड हे मुख्य रस्ते समजले जातात. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. याशिवाय या मुख्य रस्त्यांना इतर अनेक उपरस्ते जोडलेले आहेत. या रस्त्यांवरूनही मोठी वाहतूक आहे. मागील काही वर्षांपूर्वी पालिकेने पथ मार्गाची निर्मिती केलेली आहे. त्याच्या आत व्यावसायिक किंवा कार्यालयांची हद्द आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून व खरेदीसाठी अथवा कार्यालयात येणाऱ्या लोकांची वाहने लावण्यासाठी पार्किंग असावी यासाठी पथमार्गा बाहेरच्या बाजूने नगरपालिका व पोलीस प्रशासनाने पांढरे पट्टे मारलेले आहेत. या पट्टयाबाहेर वाहने लावलेली असतील, तर दंडात्मक कारवाई केली जात होती. मात्र अलिकडच्या काळात ही कारवाई थंडावली आहे. त्यातल्या त्यात श्रीरामपुरात वाहतूक पोलिस स्वतंत्र शाखा होती ती बंद करण्यात आली असून त्यामधील पोलिसांची शहर व तालुका पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. आधीच पोलिस बळ कमी त्यात वाहतूक शाखा बंद केल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई करण्यास प्रशासनाला अडचणी येत होत्या. मात्र शहरातील वाहतूक व्यवस्था व पार्किंगसह रस्त्यावरील अतिक्रमनाला शिस्त लावणे गरजेचे आहे. सर्व बँकांना नगरपालिकेने नोटिसा जारी केल्या. बँका, कार्यालये व गर्दी होणाऱ्या व्यावसायिकांनी स्वतः सुरक्षा रक्षक नियुक्त करणे गरजेचे आहे. शिवाय अनेक दुकानदारांची रस्त्यावर अतिक्रमणे आहेत. अनेकांनी दुकानापुढे लोखंडी अँगल लावून ठेवले आहेत. त्यामुळे गाड्याही लावता येत नाहीत. श्रीरामपूर शहरात दिवसभर अनेक लोक खरेदीसाठी किंवा अन्य कामांसाठी शहरात येत असतात. त्यांना वाहने लावायला जागा नसल्याने भर रस्त्यांवर वाहने लावली जातात. नगर पुण्याच्या धर्तीवर शहरातील मोकळ्या जागेत पे पार्किंग व्यवस्था केली, तर बाहेर गावाहून येणारी वाहने येथे पार्क होतील. त्यामुळे वाहतूक कोंडीही होणार नाही आणि पालिकेला उत्पन्नही मिळेल.

...तर वाहनांवर कारवाई वाहतूक व्यवस्था विस्कळीत आहे, हे खरे असले तरी मुख्य गर्दीच्या ठिकाणी, चौकात पोलिस वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतात शिवाय दंडही आकारला जात आहे. श्रीरामपुरात दररोज हजारो रुपयांची दंड वसुली केली जात आहे. मुख्य रस्त्यावर पांढरे पट्टे मारलेले आहेत, त्या बाहेर वाहने पार्क केलेले दिसल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सांगितले. पोलिसांच्या मदतीने पालिका प्रशासनाने श्रीरामपुरात अतिक्रमणावर कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...