आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहॉस्पिटलमध्ये इन्फेक्शन कंट्रोल हा महत्त्वपूर्ण घटक असतो. यासाठी प्रशिक्षित स्टाफची गरज असते. त्यादृष्टीने आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे २० जानेवारी रोजी हॅण्डस ऑन ट्रेनिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत आनंदऋषीजी ब्लड सेंटरच्या मेडिटेशन हॉलमध्ये ही कार्यशाळा होणार आहे.
या कार्यशाळेत हॉस्पिटलमधील इन्फेक्शन व काळजी, हॅण्ड हायजिन, बायो मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, ट्रान्समिशनवेळी घ्यावयाची काळजी, पर्यावरणीय मानकांचे पालन व लक्ष ठेवणे, इन्फेक्शन होवू नये यासाठी करावयाच्या मूलभूत गोष्टी, स्टर्लझायशेन अशा विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. ही कार्यशाळा नर्सेस तसेच वैद्यकीय क्षेत्रातील प्रोफेशनल्स, विद्यार्थी यांच्यासाठी उपयुक्त आहे.
आनंदऋषीजी हॉस्पिटल हे २६० बेडसचे हॉस्पिटल असून एनएबीएच मानांकन प्राप्त आहे. इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसेस ही एक संसर्ग नियंत्रणाची कार्य प्रणाली आहे. एनएबीएचच्या पाचव्या आवृत्तीनुसार आय.सी.यु, ऑपरेशन थिएटर, डायलेसिस व विविध विभागात ही पध्दत वापरली जाते. या संसर्ग नियंत्रणाच्या कार्यप्रणालीवर तज्ज्ञ मायक्रोबायॉलॉजीस्ट व इन्फेक्शन कंट्रोल नर्स २४ तास नियंत्रण ठेवतात. त्यामुळे या कार्यशाळेत प्रॅक्टिकल व थेरॉटिकल प्रशिक्षण देण्यात येईल. कार्यशाळेत मार्गदर्शन, ग्रुप डिस्कशन, प्रश्नोत्तरे होणार आहे. प्रत्येक सहभागीला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेसाठी नाव नोंदणीची अंतिम मुदत १४ जानेवारी पर्यंत आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी ८४८४००५४३२ यावर संपर्क साधावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.