आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:वंचित घटकातील मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद ; मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनतर्फे कपडे भेट

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने नवीन वर्ष ऊस तोडी कामगार व आदिवासी समाजातील मुलांना नवीन कियांची भेट दे ऊन साजरा करण्यात आला. नवीन वर्षी कियांची भेट मि‍लाने वंचित घटकातील लहान मुलांचा चेहरा आनंदाने फुलले होते.सर्वत्र नवीन वर्षाचा जल्लोष साजरा होत असताना पालामध्ये मळकटलेल्या कपड्यांनी दैनंदिन जीवन जगणाऱ्या मुलांना जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मायेने जवळ घेऊन ही अनोखी भेट दिली. जेऊर बायजाबाई (ता. नगर) येथील श्री सिद्धनाथ दत्त मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष रोहिदास महाराज जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग, शहराध्यक्ष दिलीप साळवे, राहुरी तालुकाध्यक्ष प्रकाश देठे, जामखेड तालुकाध्यक्ष भिमराव मुरूमकर, कलावती जाधव, ओमप्रकाश जाधव आदी उपस्थित होते.

रोहिदास महाराज जाधव यांनी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन मानवी न्याय, हक्कावर काम करताना वंचित घटकातील मुलांना आधार देण्याचे कार्य करत असल्याचे सांगितले. विजय भालसिंग म्हणाले, वंचित घटकातील मुले उद्याच्या भारताचा उज्वल भविष्य आहे. त्यांना शिक्षणासाठी व दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य केल्यास समाजाचा विकास साधला जाईल. दिलीप साळवे यांनी वंचितांना प्रवाहात आणण्यासाठी सर्व पदाधिकारी योगदान देत असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...