आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान:रमजान सण मुस्लिम बांधवांसाठी आनंदाची पर्वणी : आमदार काळे, मुस्लिम बांधवांनी आमदार काळे यांना आलिंगन देवून त्यांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या

कोपरगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रमजान महिना हा पावित्र्य, प्रार्थना, दानधर्म व परोपकाराचा अनोखा संगम आहे. या पूर्ण महिन्यात मुस्लिम बांधव रोजे (उपवास) धरून अल्लाची विशेष नमाज (तराबी) मध्ये कुराण पठण करतात. रमजान सण हा मुस्लिम बांधवांसाठी आनंदाची पर्वणी आहे. रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी शुद्ध आचरण, शुद्ध आचार व विचारातून मनोभावे केलेले सामुदायिक नमाज पठण अल्लापर्यंत पोहोचते. अल्लाने सर्व मुस्लिम बांधवांच्या प्रार्थनेचा स्वीकार करावा व सर्व मुस्लीम बांधवांच्या जीवनात आनंद, सुख-शांती व सर्वांना चांगले आरोग्य लाभावे, अशा शुभेच्छा श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे सर्व मुस्लीम बांधवांना रमजान ईद सणानिमित्त दिल्या.

यावर्षी कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे कोपरगावात मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात रमजान ईद चा सण साजरा करून ईदगाह मैदानावर व अक्सा मस्जिद येथे सामुदायिक नमाज पठण केले. याप्रसंगी आमदार काळे यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावर्षी ईद व अक्षय तृतीया हे दोनही सण एकाच दिवशी आले. यावेळी मुस्लिम बांधवांनी आमदार काळे यांना आलिंगन देवून त्यांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पोलिस उपअधीक्षक संजय सातव, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, उपनिरीक्षक भरत दाते, मौलाना हामिदभाई, मौलाना आसिफभाई, माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, अजीज शेख, फकीर कुरेशी, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, जावेद शेख, इम्तियाज अत्तार, रहेमान कुरेशी, फिरोज पठाण, शकील खाटीक, पप्पु सय्यद, आसिफ शेख, शफीक शेख, नदीम मन्सूरी, मुन्ना सय्यद, साजिद शेख, हारुण शेख, शकील खाटीक, शफीक सय्यद, आयुब शेख, शरीफ पठाण, चांदभाई पठाण, हाफिज रियाज, मुन्ना पठाण, अॅड. दारुवाला, जावेद एकता, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्षज संदीप वर्पे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, माजी नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...