आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:हुंड्याच्या रकमेसाठी केला विवाहितेचा छळ

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नात ठरलेले हुंड्याचे राहिलेले एक लाख रूपये माहेरहून आणण्यासाठी विवाहितेचा वारंवार शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सावेडी उपनगरात माहेरी राहत असलेल्या विवाहितेने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी पती, सासू-सासरे व नणंद अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती स्वप्नील दत्तात्रय जोशी, सासरा दत्तात्रय बाबुराव जोशी, सासू प्रज्ञा दत्तात्रय जोशी (सर्व रा. पंढरपुरनगर, हिंगोली) व नणंद पूजा श्रीराम शाखाई (रा. हैद्राबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अधिक तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...