आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथे घर घेण्यासाठी माहेरून १० लाख रूपये न आणल्याने विवाहितेचा छळ करून घराबाहेर काढल्याची घटना घडली. पीडित विवाहितेने या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती शाम राजेंद्र भोसले, सासरा राजेंद्र किसनराव भोसले, सासु विजया राजेंद्र भोसले, दिर राहुल राजेंद्र भोसले, जाव पुजा उर्फ स्नेहल राहुल भोसले (सर्व रा. शाहुनगर, केडगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. १ डिसेंबर २०१९ रोजी फिर्यादीचे लग्न शाम राजेंद्र भोसले याच्यासोबत झाले होते.

लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी पती, सासु, सासरे, दिर, जाव, यांनी फिर्यादीला पुणे येथे नवीन घर घेण्यासाठी माहेरून १० लाख रूपये घेवुन ये, असे म्हणत होते. फिर्यादीने पैसे न आणल्याने त्यांना सासरचे सर्व लोक शाररिक व मानसिक त्रास देत होते.

फिर्यादी पती सोबत डांगेचौक, थेरगाव (जि. पुणे) येथे भाडोत्री घरात राहत असताना त्यांना पतीही त्रास देत होता. पुण्यात नवीन घर घेण्याकरिता आईवडिलांकडून १० लाख घेऊन येण्यासाठी शिवीगाळ करून मारहाण करत होता. मार्च २०२२ मध्ये पती शाम याने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली व घरातूनही हाकलून दिले. त्यानंतर फिर्यादी माहेरी राहत होत्या. त्यांनी ३ सप्टेंबर रोजी भरोसा सेल येथे सासरच्या लोकांच्या विरूध्द तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...