आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरी छळ:चाळीस लाख रुपयांसाठी विवाहितेचा सासरी छळ

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहेरून ३० ते ४० लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ करण्यात आला. याप्रकरणी नगर शहरात माहेरी राहत असलेल्या पीडित विवाहितेने भरोसा सेलकडे तक्रार केली होती. तेथे समझोता न झाल्याने अखेर विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह तिघांविरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती साहील भरत बोरा (वय ३१), सासरे भरत पन्नालाल बोरा (वय ५८) व सासु कल्पना भरत बोरा (वय ५६, सर्व रा. कांढवा बु., जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी यांचा विवाह ३० मे २०१४ रोजी साहील बोरा याच्याशी झाला. लग्नानंतर त्यांना सासरच्यांनी दोन वर्ष चांगले नांदवले. यानंतर फिर्यादीला पती साहील हा नेहमी मारहाण करत असे, सासू-सासरे छळ करत होते. ‘तुझ्या बापाचा मोठा कपड्याचा व्यवसाय होता, पाच लाख रूपयेच हुंडा दिला, आणखी ३० ते ४० लाख रूपये घेऊन ये, नाही तर आमचा त्रास सहन कर’, असे म्हणून उपाशीपोटी ठेऊन सहा वर्षाच्या मुलीसह घराबाहेर काढून दिले. फिर्यादीने भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली. तेथे समझोता न झाल्याने भरोसा सेलने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानंतर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...