आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराध्येय प्राप्तीसाठी मेहनत, चिकाटी व आत्मविश्वास गरजेचा आहे, असे प्रतिपादन सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय यांनी केले. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणालय प्रवा हात आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनचा सावली संस्थेत स्नेहाचा रंगोत्सव कार्यक्रम रंगला होता. यावेळी संस्थेतील निराधार वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग व दररोजच्या वापरातील भांडीचे वाटप करण्यात आले. त्यावेळी त्या बाेलत हाेत्या. सेवाप्रीतच्या महिलांनी विद्यार्थ्यांसह सावली संस्थेत धमाल केली, तर विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेचा आनंद लुटला.
महिलांसह विद्यार्थ्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला होता. या कार्यक्रमासाठी अर्चना खंडेलवाल, गीता नय्यर, सविता चड्डा, अनू थापर, सारिका मुथा, अर्चना कुलकर्णी, लता राजोरिया, राजू खंडेलवाल, रेखा खंडेलवाल, अंजली महाजन, मंजू झालानी, संतोष खंडेलवाल, मोनिका ताथेड, तारा भुतडा, जयश्री परदेशी, डिम्पल शर्मा, ममता खंडेलवाल, बबिता खंडेलवाल, देवकी खंडेलवाल, श्रेया खंडेलवाल, जया खंडेलवाल आदींसह महिला सदस्या उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंजली राठी, अनुजा जाधव, दीपा जैन, शिल्पा पोरे, नीलम खंडेलवाल यांनी प्रयत्न केले.
रिक्षा चालक महिलेचा ‘सेवाप्रीत’तर्फे सन्मान
रिक्षा चालवून आपल्या संसाराचा गाडा चालवणाऱ्या कर्तृत्ववान महिला म्हणून नीलिमा खराडे यांचा यावेळी सेवाप्रीतच्या वतीने सन्मान करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.