आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

यूपीतील हाथरस गँगरेप केस:तुमच्या अंगणातील सीताच सुरक्षित नाही; तर राम मंदिर बनवून काय करणार योगीजी? उत्तर प्रदेशच्या मुखमंत्र्यांना तृप्ती देसाईंचा संतप्त सवाल

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदित्यनाथजी जेव्हा तुम्ही महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप मोठा आनंद होईल

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये तरुणीवर दुष्कर्म करण्यात आले. तिच्यावर सामुहिक बलात्कार करत तिची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर राजकारण प्रचंड तापल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणा बद्दल संतापाची लाट आहे. यावरुन आता भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी निषेध करत योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

'योगी जी क्या करोगे राम मंदिर बनाकर जब आपके अंगण में पल रही सीता ही सुरक्षित नही है ? असा संतप्त सवाल तप्ती देसाई यांनी या सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर उपस्थित केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट सवाल करत तृप्ती देसाईंनी टीकास्त्र साधले आहे. तसेच योगी आदित्यनाथजी जेव्हा तुम्ही महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप मोठा आनंद होईल असेही त्या म्हणाल्या आहेत.

संतप्त होत तृप्ती देसाई हाथरस येथील घटनेविषयी म्हणाल्या की, 'हाथरसमधून जी घटना समोर आली, तरुणीवर सामूहिक बलात्कार केला जातो. त्यानंतर तिने आरोपींचे नाव सांगू नये म्हणून तिची जीभ कापण्यात येते. नंतर कुटुंबीय तक्रार देण्यासाठी जातात, तेव्हा पोलीस हे गुन्हा दाखल करण्यास तपास करण्यास टाळाटाळ करतात. पाच ते सहा दिवसानंतर आरोपीला अटक केली जाते. आता या मुलीने प्राण सोडले. हे सर्व पाहता योगी सरकार नेमके काय करत आहे? असा सवालही तृप्ती देसाईंनी उपस्थित केला आहे.