आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Having Traveled 1460 Km On Foot, Had The Darshan Of Shri Sai Baba; 39 Padayatri Sai Devotees Including Chandramouli Felicitated By Sai Sansthan| Marathi News

पायी प्रवास:1460 किमीचा पायी प्रवास करुन घेतले श्री साईबाबांचे दर्शन; चंद्रमौलींसह 39 पदयात्री साईभक्तांचा साई संस्थानतर्फे सत्कार

शिर्डी20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई ते शिर्डी असे १४६० किमी पायी प्रवास करुन श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या चंद्रमौली व त्यांच्या सोबत आलेल्या ३९ पदयात्री साईभक्तांचा खंडोबा मंदिर येथे संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे व महेंद्र शेळके यांनी स्वागत करुन त्यांचा सत्कार केला. श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाइत यांनी या पदयात्रींची भेट घेऊन त्यांना पुढील वर्षाकरीतील पदयात्रेलाही शुभेच्छा दिल्या.

पदयात्री साईभक्त चंद्रमौली हे गेल्या १० वर्षांपासून चेन्नई ते शिर्डी असा १४६० किमी पायी प्रवास करुन श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. यावर्षी ५ ऑगस्ट २०२२ रोजी चेन्नई नजिक पट्टीपुलम येथील दानशूर साईभक्‍तके. व्ही. रमणी यांच्या साई मंदिरापासून पदयात्रेस प्रारंभ करुन श्री तिरुपती बालाजी, श्री गुरु राघवेंदर स्वामी मंत्रायल व श्री क्षेत्र पंढरपूर येथून दर्शन घेऊन ५ सप्टेंबर २०२२ रोजी ३२ दिवस प्रवास करुन शिर्डी येथे पोहचले. चंद्रमौली यांच्या समवेत ३९ साईभक्तांचा समावेश आहे. यासर्व पदयात्रींना शिर्डीपर्यंत प्रवासादरम्यान दानशूर साईभक्त रमणी यांचे सहकार्य लाभले. तसेच संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे यांनी या सर्व पदयात्रींची गुहा ता.राहुरी येथे भोजनाची व मुक्कामाची व्यवस्था केली.हे सर्व पदयात्री शिर्डीतील खंडोबा मंदिर येथे पोहचल्यानंतर संस्थानच्या वतीने संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे व महेंद्र शेळके यांनी त्यांचे स्वागत करुन सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...