आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धबधबा:अंगावरला शुभ्र शेला झेलून हृदयाशी धरला.

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात हिरवेगार वस्त्र ल्यालेल्या डोंगरांवरून वाहणारे धबधबे पाहिले की जणू काही पांढरा शुभ्र शेला अंगावर घेऊन मोठ्या रुबाबात ते आपल्याला खुणावत आहे की काय असे वाटून जाते. नाशिक व अहमदनगरच्या सीमेवर सिन्नरपासून ३० किमी अंतरावर अकोले तालुक्यातील पट्टा किल्ला (विश्रामगड) भागात तिरड्याच्या डोंगरावरील हा धबधबा आहे. वरचा धबधबा ३० फुटांहून, तर खालचे २ धबधबे १५ फूट उंचीवरून कोसळत असून हे त्रिवेणी शुभ्र शेले पर्यटकांना आकर्षित करताहेत. छाया : भानुदास बैरागी.

कसे जाल सिन्नरहून डुबेरे- ठाणगाव- पाचपट्टा मार्गे तिरड्याच्या या डोंगरावर पोहोचता येते.

बातम्या आणखी आहेत...