आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​स्वत: च्या वाढदिवसाच्या दिवशी किरण काळेंचे अनोखे आवाहन:म्हणाले - वाढदिवसाला हार-तुरे नको, शहरातील खड्ड्यांचे फोटो भेट पाठवा

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरात सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहेत. रस्ता शोधूनही सापडायला तयार नाही. यासाठी मी काँग्रेसच्या माध्यमातून लढा उभारत आहे. महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे माझ्या वाढदिवसानिमित्त मी शहरातील नागरिकांना खड्ड्यांचे फोटो मला वाढदिवसाची भेट म्हणून पाठवा, असे अनोखे आवाहन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

रस्त्यांच्या प्रश्नावर दाद न मिळाल्यास मुंबईत उपोषणाला बसण्याचा इशारा काळे यांनी दिला होता. उपोषणाच्या वेळी नागरिकांनी पाठविलेल्या खड्ड्यांच्या फोटोंचे प्रदर्शन मुंबईत लावून थेट राज्य सरकारचे मला वेधायचे आहे.

उद्या वाढदिवस

काळे यांचा 5 नोव्हेंबरला वाढदिवस असतो. दरवर्षी हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मागील वर्षी वाढदिवसानिमित्त, किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने किरण कला - क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यावर्षी काळे यांनी कार्यकर्त्यांना या सर्व कार्यक्रमांना फाटा देण्याचे आवाहन केले आहे. शहरातील खड्ड्यांच्या दयनीय अवस्थेमुळे आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

काळे म्हणाले, आज नगर शहरातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याशी निगडित असणारा रस्त्याचा प्रश्न गेल्या प्रश्न गंभीर बनला आहे. नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, लघुउद्योजक, उद्योजक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, भाजीवाला, रिक्षावाला, विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रत्येक घटक या समस्येने सामूहिक नैराश्येच्या गर्तेतेत सापडला आहे. हा प्रश्न आता कधीच सुटणार नाही, अशी भावना दुर्दैवाने नागरिकांची झाली आहे.

काय म्हणाले काळे?

अशा परीस्थितीमध्ये वाढदिवसाचा समारंभ करत तो साजरा करणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळेच यावर्षी वाढदिवसाला केक, हार-तुरे, बुके ही भेट न देता शहरातील रस्त्यांवर असणारे आपापल्या परिसरातील खड्ड्यांचे फोटो मला पाठवावेत. मी हे सर्व फोटो संकलित करून प्रशासन, शासन आणि लोकप्रतनिधींपर्यंत पोहोचवून नगरकरांच्या या गंभीर प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एल्गार करणार असल्याचा इशारा दिला.

कशी आहे शहरातील रस्त्यांची स्थिती ?

नगर शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. रस्त्यांना मोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी शहर काँग्रेसकडून प्रशासकीय कारभारावर टीका केली जात आहे

बातम्या आणखी आहेत...