आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळेंचा इशारा:म्हणाले - नगर शहरातील रस्त्यांच्या प्रश्नासाठी मुंबईत उपोषण करणार

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यापूर्वी आम्ही नगरमध्ये आंदोलन करून स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आता नगर विकास खात्याचेही लक्ष वेधले असून तसे निवेदन मंत्रालयात दिले आहे. जर रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला नाही तर मुंबईत जाऊन मंत्रालयात उपोषण केले जाईल असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे.

काळे म्हणाले, नगर शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे अंतर्गत रस्त्यांनाही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्याचा त्रास सर्वसामान्य नगरकरांना होत आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत मंत्रालयात नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी दयानंद चिंचोलीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. मी आमदार नसलो तरी वेळप्रसंगी नगरकरांसाठी मी मुंबईत उपोषणास बसेल, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र देऊन लक्ष वेधले आहे. अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. यापूर्वीच्या दर्जाहीन रस्त्यांच्या कामामुळे जुने रस्ते गायब झाले आहेत.

सुस्थितीतील रस्त्यांची लोकप्रतिनिधींच्या अट्टाहासपोटी खोदाई करण्यात आली. जनतेचे कोट्यावधी रुपये पाण्यात गेले असून त्यांची कामे देखील अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. अनेक रस्त्यांची दुबार नावे देत स्वतः मनपाने कामे झाले असे घोषित केले असून यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत देखील रस्त्यांचा दुरावस्थेमुळे व्यापारी, नागरिक हैराण आहेत. सर्व उपनगरांची देखील हीच स्थिती आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक पातळीवर यापूर्वी असून आसूड मोर्चा काढण्यात आला होता.

तसेच शहरांमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवून रस्त्यांच्या प्रश्नाबाबत आम्ही आवाज उठवला होता. त्यामुळे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शासन स्तरावरून तातडीने आवश्यक ती पावले उचलण्यात यावीत. अन्यथा संविधानिक पद्धतीने या विरोधात तीव्र स्वरूपात आवाज उठविण्यात येईल, प्रसंगी उपोषण करण्यात येईल, असा इशारा काळे यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...