आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज यांना पाहायला जाणे महागात पडले:राज ठाकरे यांना पाहायला गेला अन् 4 लाखांची सोन्याची चेन गमावून बसला

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाहायला जाणे एका व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. माळीवाडा बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गर्दीत उभे असताना या व्यावसायिकाच्या गळ्यातील सुमारे ४ लाखांची साडेआठ तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून नेल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद रमेशलाल बेदमुथा यांनी फिर्याद दिली आहे. औरंगाबाद येथील सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारी नगरमार्गे औरंगाबादला रवाना झाले. नगर शहरात दुपारी बसस्थानक चौकात मनसेच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी नागरिकांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. अनेक नागरीक उत्सुकतेपोटी राज ठाकरे यांना पाहण्यासाठी आले होते. दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास बेदमुथा हेही त्यांचे मित्र श्रीधर दारुणकर यांच्यासमवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राज ठाकरे यांना पाहण्यासाठी गेले होते. या वेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन पळवली. गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील साडेआठ तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांना पाहायला जाणे या व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडल्याची चर्चा परिसरात होती.

बातम्या आणखी आहेत...