आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक:भटक्या समाजाला संघटित करून शासनाला ताकद दाखवून देणार; जोशी समाज सेवा संघाचे संस्थापक मापारे यांची माहिती

पाथर्डी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाकडून भटक्यांची सर्वाधिक उपेक्षा होत आहे. शासनाच्या कोणत्याही योजना भटक्यांपर्यत पोहोचत नाहीत. सरकार कुणाचेही असो भटके भटकेच राहिले आहेत. आता सर्व समाजामध्ये जागृती वाढली आहे. विविध पोटजाती परस्परांमध्ये भांडतात. आता ते सर्व बंद करून सर्व भटक्यांना एकत्र करून भटक्यांची ताकद शासनाला दाखवून देऊ. आगामी काळात भटक्यांची ताकद सत्ताधीश ठरवतील, एवढी संघटित करणार असल्याची माहिती जोशी समाज सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष वामनराव मापारे यांनी दिली.

मढी येथील जोशी समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र जोशी, राज्य प्रवक्ते नारायण पाटील, कार्याध्यक्ष सोपान महापुरे, सचिव बाबासाहेब महापुरे, शिवाजी जोशी, बाळासाहेब साळवे, अशोक साळवे, आनंद महाराज जोशी आदी उपस्थित होते. मापारे म्हणाले, भटके समाज खरोखरच राज्यभर भटकंती करतात. कायमस्वरूपी पत्ता नसल्याने आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड निघत नाही. ज्या तहसील क्षेत्रात भटक्या कुटुंबाचे कायमचे वास्तव्य आहे.

तेथील तहसीलदारांनी संघटनेची शिफारस हाच पुरावा म्हणून भटक्यांचे प्रमाणपत्र द्यावे. आरक्षण नसल्याने शिकून उपयोग नाही, अशी समजून करत तरुणांमध्ये बेरोजगारी वाढत आहे. आरक्षित वर्ग चुकीच्या गृहीत धरला जाऊन त्यामध्ये अनेक घटकांचा समावेश असल्याने आमचे हक्क हिरावले जात आहेत. अनुसूचित जाती-जमातीसारखे आरक्षण आम्हाला मिळावे. व्यवसायाचे शिक्षण, आरोग्य सुविधा मोफत मिळत जिल्हास्तरावर कर्ज सुविधा मिळावी. शासनाने भटक्यांना जामीन राहावे म्हणजे अन्य कागदपत्रांची पूर्तता आवश्यक उरणार नाही. समाजाच्या सहनशिलतेचा आता अंत होऊन होत आला असून न्याय हक्कासाठी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

जिल्हाध्यक्ष राजेंद्र जोशी म्हणाले, राज्यातील पडिक गायरान जमिनी जोशी समाजाला कसण्यासाठी द्याव्यात. भटक्या जोशी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करून शासनाने प्रत्येक जिल्हास्तरावर भटक्यांच्या पाल्यांसाठी वसतिगृहे सुरू करावेत, अशीही मागणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...