आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व अहमदनगर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ९ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय, टिळक रोड, नगर येथे जिल्हास्तरीय मुख्याध्यापकांचे एकदिवसीय चर्चासत्राचे व जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला, अशी माहिती मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संचालक दिनकरराव टेमकर, महेश पालकर हे असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप, आमदार सुधीर तांबे, आमदार किशोर दराडे असणार आहेत. यावेळी वक्ते शरद गोसावी, औंदुबर उकिरडे, भगवानराव खारके मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मुख्याध्यापक संघाच्या विचारमंथन असलेल्या ‘ज्ञानकलश’चे प्रकाश शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, अशोकराव कडूस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्याध्यापक महामंडळाचे सुभाष माने, शांतराम पोखरकर, अरुण थोरात, जे. के. पाटील, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, प्रशासनाधिकारी श्रीराम थोरात, लेखाधिकारी दीपक प्रधान, स्वाती हवेले आदी उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्रामध्ये विना अनुदानित व अंशत: अनुदानावरून अनुदानित शाळेवर बदली व वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी वेळोवेळी झालेले शासन निर्णय, शंका समाधान, विद्यार्थ्यांच्या नावात, आडनावात, जात, पोटजात, जन्म तारेखत बदल करण्याबाबतचे नियम, पद्धती व अर्जाचे नमुने, रजा, सेवा ज्येष्ठता, शालेय अभिलेखे, नोंदवह्या व परीक्षण कालावधी, इयत्ता नववी ते बारावी नवीन विषय योजना व सुधारित मुल्यमापन आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या चर्चासत्रात विविध महत्त्वपूर्ण शैक्षणिक विषयावर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, सरचिटणीस बाळासाहेब कळसकर, उपाध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी, राजेंद्र वाघ, मिथून डोंगरे, निवृत्ती इले, संजय लहारे, आबा गडदे, भाऊसाहेब रोहोकले, राजेंद्र सोनवणे, उद्धव सोनवणे, बबनराव पवार, ज्ञानदेव बेरड, अनुराधा पोखरकर, शितल बांगर, शहेनाज सय्यद, आशा धनवटे, अनिता गायकवाड आदींनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.