आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर:लसीकरण केंद्रावर आरोग्य अधिकाऱ्याची वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या, पाथर्डी तालुक्यात करंजी आरोग्य उपकेंद्रातील घटना

नगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी डॉ. गणेश गोवर्धन शेळके (४०) यांनी लसीकरण सुरू असतानाच कार्यालयात गळफास घेऊन मंगळवारी आत्महत्या केली. घटनास्थळी सुसाइड नोट आढळून आली असून त्यात तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद आहे. डॉ. शेळके करंजी आरोग्य उपकेंद्रात समुदाय अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते बहिरवाडी (ता. नेवासे) येथील रहिवासी होत. मंगळवारी उपकेंद्रात लसीकरण सुरू होते. डॉ. शेळके यांनी कर्मचाऱ्यांना एक कागद व पेन मागितला. त्यांच्या दालनाचा दरवाजा आतून बंद केला.

दरवाजा तोडून पाहिले असता डॉ. शेळकेंनी फॅनला गळफास घेतल्याचे दिसले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान दराडे, तहसीलदार, जिल्हाधिकारी व वरिष्ठांच्या जाचास कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे डॉ. शेळके यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. वेळेवर पेमेंट न करणे, अतिरिक्त कामाचा ताण, पेमेंट कपातीच्या धमक्या देणे असे प्रकार वरिष्ठांकडून घडत असल्याचे यात नमूद आहे.

बातम्या आणखी आहेत...