आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य तपासणी:कोल्हे सहकारी कारखाना कार्यस्थळावर ऊसतोडणी कामगारांची आरोग्य तपासणी

कोपरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर उसतोडणीसाठी आलेल्या कामगार, महिला व मुले-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली. अध्यक्षस्थानी संचालक बापूराव बारहाते होते. कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक केले. ते म्हणाले की, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी वंचित, उपेक्षितांच्या जीवनात सातत्याने आनंद निर्माण केला. गेल्या ६३ वर्षांपासून कारखाना कार्यस्थळावर उसतोडणी कामगारांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते. त्यांना अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे हे स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संपूर्ण मतदारसंघात विविध आरोग्य शिबिरे घेत असतात.संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिकेत खोत, स्त्री रोगतज्ञ डॉ. मंजूषा गायकवाड, डॉ. प्रियांका मुळे, शिंगणापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कृष्णा पवार यांनी लसीकरण, आहार, व्यायाम यांसह नियमित आरोग्य तपासणीचे फायदे सांगितले. ऊसतोडणी कामगारांना शारीरिक कष्ट असल्याने त्यांनी आरोग्य तपासणी नियमित करुन घ्यावी.केन मॅनेजर जी. बी. शिंदे, ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे यांनी उपस्थिताचा सत्कार केला. सूत्रसंचालन कारखान्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. मनोज बत्रा यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...