आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा:4 मंडळात अतिवृष्टी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना, 12 तासांत 40 मिमी पावसाने दाणादाण

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित फोटो - Divya Marathi
संग्रहित फोटो

अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विशेषतः हा राहता, कोपरगाव, श्रीरामपूर संगमनेर , अकोले या तालुक्यात बुधवारी रात्री दहा वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने दाणादाण उडून दिली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. जिल्ह्यात चार मंडळामध्ये अतिवृष्टी झाली गुरुवारी हवामान विभागाने अहमदनगर जिल्ह्यात पुढचे तीन दिवस वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. अशी माहिती गुरुवारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

संगमनेर तालुक्यातील साकुर 115, कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव 109, अकोले तालुक्यातील वीरगाव 102 तर सर्वाधिक नेवासे 158 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गुरुवारी सकाळी कडक ऊन पडले होते. दुपारी तीन नंतर शहरासह जिल्ह्यात पुन्हा विजेच्या कडकडेसह पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दुपारी पाऊस बरसला

गेल्या पंधरा दिवसापासून अहमदनगर शहरासह जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली होती. गेल्या दोन दिवसापासून तुरळक व हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बुधवारी रात्री दहा वाजता सुरू झालेल्या पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत कायम होता. प्रामुख्याने जिल्ह्याच्या उत्तर भागात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. गुरुवारी सकाळी कडक ऊन पडले होते. उकाडाही वाढला होता. गुरुवारी दुपारी तीननंतर अहमदनगरमध्ये विजेच्या कडकट्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

24 तासात 40 मिलिमीटर पाऊस

शहराच्या अनेक भागात या पावसामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये पाणी घुसले होते. दरम्यान पुढचे तीन दिवस अहमदनगर शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 40 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

24 तासांत झालेला पाऊस

नगर 20, पारनेर 42, श्रीगोंदे 40, कर्जत 21, जामखेड 19, शेवगाव 7, पाथर्डी 18, नेवासे 28, राहुरी 27, संगमनेर 58, अकोले 79, कोपरगाव 63, श्रीरामपूर 81, राहता 69 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करा

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी गुरुवारी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...