आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमध्ये धुव्वाधार:विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस; नागरिकांची उडाली धांदल

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहर व परिसरात मंगळवारी साडेपाच वाजता मुसळधार पाऊस झाला. शहरात विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाचा देखावे पाहण्यासाठी अहमदनगर शहरात आलेल्या उपनगरातील नागरिकांना मोठा फटका बसला. शहर व परिसरात तासभरापेक्षा अधिक काळ या पावसाचा जोर कायम होता.

अहमदनगर शहर व परिसरात गणेशोत्सवापासूनच पावसाला सुरुवात झाली होती. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. अहमदनगर शहर व परिसरात साडेपाच वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर चाललेल्या पावसामुळे नागरिकांच्याही मोठे हाल झाले.

गणेशउत्सवामुळे देखावे पाहण्यासाठी उपनगरासह शहरातील नागरिक पडले असतानाच मुसळधार पावसाने त्यांना झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे शहरातील माळीवाडा, दिल्ली गेट, चौपाटी कारंजा या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसामुळे सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचबरोबर उपनगरांमध्ये देखील मुसळधार पावसाने हजेरी लावत नागरिकांची धांदल उडवली.

मुसळधार पावसामुळे मंगळवारी रात्री सात वाजता नगर- औरंगाबाद रस्त्यावरील डीएसपी चौकात अशी वाहतूक कोंडी झाली होती. हीच परिस्थिती कोठला व सक्कर चौकातही होती.
मुसळधार पावसामुळे मंगळवारी रात्री सात वाजता नगर- औरंगाबाद रस्त्यावरील डीएसपी चौकात अशी वाहतूक कोंडी झाली होती. हीच परिस्थिती कोठला व सक्कर चौकातही होती.

जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. विशेषतः सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तीच परिस्थिती शहरात देखील होती. शहर व परिसरातील भिंगार केडगाव सावेडी भागात विजेच्या कडकडेसह मुसळधार पाऊस झाला.

आतापर्यंत झालेला पाऊस

अहमदनगर जिल्ह्यात 1 जून ते 6 सप्टेंबर पर्यंत 448 मिलिमीटर पाऊस झाला असून, नगर 479, पारनेर 414, श्रीगोंदे 402, कर्जत 447, जामखेड 576, शेवगाव 463, पाथर्डी 473, नेवासे 429, राहुरी 431, संगमनेर 351, अकोले 488, कोपरगाव 404, श्रीरामपूर 463, राहता 454 पाऊस झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...