आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरच्या 7 महसूल मंडळात अतिवृष्टी:पारनेर तालुक्यातील मांडओव्हळ धरण ओव्हरफ्लो, रात्रभर शहर व परिसरात पावसाची संततधार

अहमदनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 7 महसूल मंडळात बुधवारी मध्यरात्री अतिवृष्टी झाली असून, पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण व भाळवणी या महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे गुरुवारी सकाळी मांडओव्हळ धरण ओव्हर फ्लो झाले आहे. दरम्यान पारनेर तालुक्यातील पळवे येथे वीज कोसळून एका गाईचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात रात्रभर पाऊस सुरू होता. गुरुवारी सकाळी देखील पावसाचा जोर कायम होता. अहमदनगर शहराजवळील केडगाव या उपनगरात अतिवृष्टी झाली असून, जिल्ह्याच्या अन्य भागात देखील अतिवृष्टी झाली आहे. केडगाव मध्ये 88 मिलीमीटर पाऊस झाला असून, अहमदनगर शहरातील सावेडी 47, नालेगाव 47, कापूरवाडी 40, भिंगार 46, नवनागापूर 32 व चास 47 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 28 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत 447 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

मांडओहोळ धरण ओव्हरफ्लो

बुधवारी मध्यरात्रीनंतर पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथे 88 तर भाळवणी येथे 71 मिलीमीटर पाऊस झाला आहे. या दोन महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे मांडओहोळ धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

पिकांचे नुकसान

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन 66, शेवगाव तालुक्यातील शेवगाव 76, भातकुडगाव 82 व बोधेगाव 86 मिलीमीटर पाऊस झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 7 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून, शेती पिकाचे देखील नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गावांना सतर्कतेचा इशारा

मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात पाण्यात पावसाचा जोर वाढला असून, या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गुरुवारी प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान गुरुवारी दुपारी 12 वाजता भंडारदरा धरणातून प्रवरा नदी पात्रात 814, निळवंडे धरणातून 1 हजार 134, ओझर बंधाऱ्यातून 2 हजार 543, नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीत 11 हजार 906, भीमा नदीतून 19 हजार 408, घोड धरणातून घोड नदीत 19 हजार 140, मुळा धरणातून मुळा नदीत 20 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

24 तासांत झालेला पाऊस

नगर 38, पारनेर 52, श्रीगोंदे 36, कर्जत 24, जामखेड 1, शेवगाव 62, पाथर्डी 41, नेवासे 19, राहुरी 20, संगमनेर 24, अकोले 20, कोपरगाव 10, श्रीरामपूर 13, राहता 12 मिलीमीटर पाऊस गेल्या 24 तासांत झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...