आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:जोरदार पावसामुळे टाकळीभानमध्ये खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान

टाकळीभान24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपुर तालुक्याच्या पुर्वभागातील टाकळीभान येथे गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या दरम्यान झालेल्या जोरदार वादळामुळे शेतातील खरीपाची पिके आडवी झाली. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास वादळाने हिरावुन घेतल्याने वादळामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे होवुन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी वादळग्रस्त पट्यातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे गाव कामगार तलाठी अरुण हिवाळे यांच्याकडे केली आहे.

आपतग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, गुरुवार दिनांक १ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता अचानक जोराचे वादळ सुरु झाले होते. या वादळामुळे शेतातील कपाशी, सोयाबीन, बाजरी, मका, उस आदी खरीप पिके वेगवान वादळामुळे भुईसपाट झाली आहेत. पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास वादळामुळे हिरावला जावुन मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.या वादळी पट्ट्यात काही ठिकाणी गारपिट झाल्यानेही पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. तरी या पट्यातील सर्व नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पहाणी करुन नुकसानीचे पंचनामे करावेत व झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या वादळामुळे शेतबांधावरील मोठमोठी झाडे उन्मळुन पडली आहेत. या निवेदनावर सुनिल बोडखे, उमेश त्रिभुवन, मच्छिंद्र बोडखे, गोरख बोडखे, सुनिल त्रिभुवन, अनिस बोडखे, राजेंद्र कोकणे, संदीप बोडखे, अजित थोरात, बाळासाहेब शेळके, अशोक वेताळ, भाऊसाहेब कोकणे, लक्ष्मण सटाले, कल्याण आठरे आदींच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...