आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहुरी तालुक्यातील वांबोरी येथे शनिवारी वादळासह जोरदार पावसाने हजेरी लावली. महावितरणचे विद्युत पोल व झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. वांबोरी-कुक्कडवेढे रस्ता वाहतुकीसाठी काही बंद झाला तर पागीरे वस्तीवर पत्र्याचे शेड उडाले.
वांबोरी परिसरात शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. जोरदार वादळ व पावसामुळे विजेच्या तारा तुटल्या तसेच पोल उन्मळून पडले आहेत. वांबोरी कुक्कडवेढे रस्त्यावर पोल पडल्याने वाहातुकीस अडथळा निर्माण झाले. तसेच पागीरे वस्ती, गडाखवस्ती, पटारे वस्ती येथील शेतकर्यांचे पत्र्याचे शेड उडून मोठे नुकसान झाले.
याबाबत माजी जि.प. अध्यक्ष बाबासाहेब भिटे म्हणाले, विजेचे पोल व झाडे उन्मळून पडल्याने महावितरण व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील झाडे व विद्युत खांब हटवण्याचे काम सुरू झाले आहे. तलाठी कार्यालयालाही पंचनामें करण्याच्या सुचना दिल्या असल्याचे सांगितले.
घरांचेही झाले मोठे नुकसान
वांबोरी येथील सयाजी पागीरे, तुळशीराम पागीरे यांच्या घराचे वादळात मोठे नुकसान झाले. तसेच संसारापयोगी साहित्याचीही वादळात मोडतोड झाली. तसेच परसराम पागिरे यांच्या मोटार सायकलवर झाड कोसळून गाडीचे नुकसान झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.