आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर ठिकठिकाणी असलेल्या बोगद्यांमधील क्रॉस रस्त्यांच्या खोलीमुळे पावसाळ्यात पाणी व गाळ साचून आठ - आठ दिवस वाहतुकीची समस्या निर्माण होऊन दळणवळण विस्कळीत होते. शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या विचारात घेऊन बोगद्याखालील रस्त्यांची उंची ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी केली.
तसे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठवले आहे. समृध्दी महामार्गाचा लोकार्पण सोहळा ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतीच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी नागपूर ते शिर्डी पूर्ण झालेल्या महामार्गाच्या कामाची पाहणी केली. हे काम पूर्णत्वास येत असल्याचा सर्वांना आनंदच आहे. या महामार्गाने दळणवळणासह वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. तथापि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत केल्या त्यांची अवस्था पहावी, असे म्हटले आहे.
ज्या ठिकाणी रस्त्यांवर पूल तयार केले आहेत, त्या बोगद्याखाली क्रॉस रस्त्याची उंची ठेवणे गरजेचे आहे. खोलीमुळे पावसाळ्यात बोगद्यामध्ये पाणी साचून वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. कमरेइतके साचणारे पाणी आणि गाळ, चिखल यामुळे प्रचंड अडचणी येतात. ठेकेदार तसेच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही काही उपयोग झाला नाही.दुरुस्तीची कामे येत्या ३१ डिसेंबरपर्यंत न झाल्यास ठेकेदार व अधिकारी वर्गास शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. यातून उद्भवणाऱ्या परिणामास जिवीतहानीस व नुकसानीस संबंधित ठेकेदार व शासकीय यंत्रणा जबाबदार राहील असा इशाराही परजणे यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.