आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा उद्योजक:पाथर्डीतील कर्करोगग्रस्त युवकाला मदत करावी ; नितीन एडके यांचे आवाहन

पाथर्डी शहर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील राकेशला कर्करोगासारख्या आजार जडल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट ओढवले. अशा संकटात प्रत्येकाने त्याला आर्थिक मदत करावी, असे आवाहन उद्योजक नितीन एडके यांनी केले.

शहरातील इंदिरानगर येथील राकेश माणकेश्वर याला कर्करोग आजार झाला. माणकेश्वर हा कापड दुकानात कामगार म्हणून अनेक वर्ष काम करत होता. त्याच्या कुटुंबामध्ये आई, वडील, पत्नी व दोन मुले आहेत. संपूर्ण कुटुंबाचा आधार राकेश हाच आहे. मात्र, कर्करोगाने राकेश त्रस्त असल्याने संपूर्ण कुटुंब अडचणीत आले. ही माहिती शहरातील सामाजिक कार्यकर्ते व सध्या नागपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचारी असलेले जावेद मणियार यांना समाज माध्यमाद्वारे समजली.

माणकेश्वर यांना मदत करण्याचे चार दिवसांपूर्वी त्यांनी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यासह राज्याच्या विविध भागातून मदत सुरू झाली. मुलांच्या शिक्षणासह कुटुंबाचा दैनंदिन खर्च यासह राकेश यांचा दवाखान्याचा खर्चाचा भार आता कुटुंबावर पडल्याने कुटुंब अडचणीत सापडले. मानवताधर्म म्हणून दानशूर व्यक्तींनी माणकेश्वर यांना सोनाली राकेश मानकेश्वर अकाउंट नंबर ३५७३२१०७४६५ आयएफएसी कोड SBIN ०००१३०७ किंवा ८४८४८०५२३३ या फोनपे नंबरवर मदत करण्याचे आवाहन जावेद मणियार, नितीन एडके, एजाज शेख यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...