आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात:शहीद वीर जवान ज्ञानेश्वर मोरे यांच्या परिवारास शिक्षक सोसायटीची मदत

श्रीगोंदे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील एरंडोली येथील शहिद वीर २३ मराठामध्ये सुभेदार पदावर असलेले सुभेदार ज्ञानेश्वर सखाराम मोरे यांच्या परिवारास अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटी पुरोगामी शहीद जवान योजनेअंतर्गत शहिदांच्या वारसास ५१ हजार रुपयांची अर्थीक मदत देण्यात आली. जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या पुरोगामी शहीद जवान योजनेअंतर्गत जवान मोरे यांचे वडील सखाराम मोरे, आई सुलोचना मोरे तसेच त्यांच्या पत्नी सुरेखा ज्ञानेश्वर मोरे यांना अर्थिक मदत देण्यात आली. यावेळी सोसायटीचे संचालक अजित वडवकर, छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिन लगड, सोसायटीचे संचालक दिलीप काटे, ज्येष्ठ संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे, मुख्याध्यापक साहेबराव काळे, रमजान सय्यद, कुकडी कारखान्याचे संचालक-कचरू मोरे, सुभेदार संजय शेळके, बाळासाहेब जगताप, दत्तात्रय इथापे, विलासराव शितोळे, भाऊसाहेब शितोळे, देवराम दरेकर, बाळासाहेब मांडगे, प्रा. विकास इथापे, भास्कर जगताप, संभाजी इथापे, शिवाजी इथापे, सुरेश जगताप, राम पखाले, खंडू इथापे, शंकर साबळे, घेगडे ज्योती, वसंत पंधरकर, विकास शिंदे, अशोक शिंदे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...