आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:समाजऋणातून उतराई होण्यासाठी‎ गरजूंना मदत करा ; अशोक कोठारी‎

नगर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाजऋणातून उतराई होण्यासाठी गरजूंना‎ मदत करण्याची तयारी असली पाहिजे. आपण‎ दिलेला आधार त्यांच्यासाठी अतिशय‎ महत्त्वाचा असतो. यातून लाखमोलाचे‎ आशीर्वाद मिळतात. जैन वात्सल्य संस्था‎ अनेक वर्षांपासून नगरमध्ये सामाजिक कार्य‎ करीत आहे. अखंडपणे सुरू असलेल्या या‎ मदतीच्या उपक्रमात सहभागी होताना आनंद‎ मिळत असल्याचे प्रतिपादन अशोक कोठारी‎ यांनी केले.‎ जैन ओसवाल वात्सल्य संस्थेच्या वतीने दर‎ महिन्याप्रमाणे या महिन्यात गरजू कुटुंबांना‎ महिनाभराचा किराणा व अन्नधान्याचे वाटप‎ करण्यात आले.

अशोक कोठारी यांच्या‎ निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी‎ संस्थेचे अध्यक्ष अजित बोरा, सेक्रेटरी विजय‎ गुगळे, अर्बन बँक, तसेच जैन ओसवाल‎ पतसंस्थेचे संचालक ईश्वर बोरा, विजय‎ गुंदेचा, मनीष गुगळे, महेश गुगळे, सम्यक‎ कोठारी आदी उपस्थित होते.‎ या उपक्रमासाठी सौरभ बोरा, प्रमिला बोरा,‎ रमेश फिरोदिया, सविता फिरोदिया, अशोक‎ बोरा, गौतम बोरा, किशोर श्रेयस पितळे,‎ चंपालाल मुथा, पनालाल बोगावत, अनिल‎ पोखरणा, अजय बोरा, अॅड. विकी मुथा,‎ अभय श्रीश्रीमाळ, सतीश मुथा, कुणाल गुगळे,‎ रितेश कोठारी, साहिल मुथा आदी उपस्थित‎ होते.‎

बातम्या आणखी आहेत...