आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत:मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून चार तासांत मदत

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्करोगाच्या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाच्या महत्त्वाच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून स्व. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे संपर्कप्रमुख रणजीत परदेशी, उपजिल्हाप्रमुख काका शेळके व शहर प्रमुख अनिकेत कराळे यांनी अवघ्या चार तासांत आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली.

रुग्णाचे बंधू अनिल लवांडे यांनी पाठपुरावा करुन आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल या पदाधिकाऱ्यांचे आभार मानून ऋण व्यक्त केले. अनिल लवांडे यांचे मोठे बंधू कर्करोगाच्या दुर्धर आजाराने त्रस्त आहे. त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले होते.

खर्चिक शस्त्रक्रियेसाठी संबंधित पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून रुग्णासाठी १ लाख रुपयाचा निधी मंजूर करुन तो हॉस्पिटलला वर्ग केला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर शिवसैनिकाला मदत करून न्याय दिल्याचे समाधान असल्याची भावना अनिकेत कराळे यांनी व्यक्त केली. रुग्णाचे बंधू लवांडे यांनी जनहितासाठी सुरू असलेले वैद्यकीय मदत कक्षाचे कार्य समाधान देणारे असल्याची भावना व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...