आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक उपक्रम:सफाई कामगार व महिलांची हिमोग्लोबिन तपासणी शिबिर

पाथर्डी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रथम मानाचा पुरातन चिंतामणी गणेश व नवोदय तरुण मंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रमांतर्गत शहरातील सफाई कामगार व महिलांचे हिमोग्लोबिन तपासणी शिबिर घेण्यात आले.आमदार मोनिका राजळे, नामदेव लबडे, अनिल बोरूडे, महेश बोरूडे, रमेश काटे, शिवसेनेच्या शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष अंकुश चितळे, डॉ. मनीषा खेडकर, मंगल कोकाटे, सिंधू साठे, डॉ. ज्योती देशमुख,डॉ.विद्या दराडे आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.चिंतामणी गणेश मंदिर ट्रस्ट, नवोदय तरूण मंडळ व लक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये सुमारे ७० स्वच्छतादूतांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्या तपासणीचे प्रमाणपत्र व त्यावरील उपचारांचे किट आमदार राजळे यांचे हस्ते वितरीत करण्यात आले. या शिबिरासाठी किशोर देशमुख, दत्तात्रय ईजारे, दर्शन तुंगार, बाळासाहेब भोसले, बाळासाहेब ईजारे, अभिजीत कुलकर्णी, प्रणव देशमुख आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक मंदिर ट्रस्टचे सचिव डॉ.श्रीधर देशमुख यांनी, स्वागत नवोदय तरूण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, तर आभार डॉ.ज्ञानेश्वर दराडे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...