आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गाची पाहणी करून आढावा:महामार्गामुळे कृषी व औद्योगिक क्षेत्राला मिळेल समृध्दी : विखे

शिर्डी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राला समृध्द करणारा समृध्दी महामार्ग विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह कोकणपट्टयाला जोडला जाणार असल्याने या चार विभागातील कृषी आणि औद्योगीक क्षेत्र समृध्द होईल, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला. नागपुर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री विखे यांनी महामार्गाची पाहणी करून आढावा घेतला. उद्घाटनाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी शिर्डी येथील समृध्दी महामार्गावर मंडप उभारला आहे.

दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहता येणार आहे. विखे म्हणाले, हा महामार्ग जनतेच्या मनाशी जोडणारा आहे. राजधानीपासून ते उपराजधानीपर्यंत जोडणारा राज्यातील पहिला महामार्ग आहे. चार विभागांना जोडणारा महामार्ग २० जिल्ह्यातून जात असल्याने विकासाला गती मिळणार आहे. हा महामार्ग विकसित होण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मोठे आहे. हा मार्ग आता शेती व्यवसायासाठी उपयुक्त ठरणार असुन विदर्भ आणि खान्देशमधील शेतकरी आपला उत्पादित माल थेट मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेऊ शकेल. हा मार्ग ग्रीनफिल्ड मार्ग म्हणूनही ओळखला जाईल. राज्यात उद्योगधंदे वाढीसाठी या मार्गाचा लाभ होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...