आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:हिंद सेवा मंडळाने गेल्या शंभर वर्षांत‎ शिक्षणाचा प्रकाश सर्वदूर पोहोचवला‎

नगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंद सेवा मंडळ असे सेवार्थी नाव‎ ज्यांनी या संस्थेचे ठेवले त्यांचे‎ सर्वप्रथम अभिंनदन. हिंद सेवा‎ मंडळाने गेल्या शंभर वर्षांपासून‎ ज्ञानाचा व शिक्षणाचा प्रकश सर्वदूर‎ पोहचवण्याच्या कार्य केले आहे, असे‎ प्रतिपादन अयोध्येच्या श्रीराम‎ जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष‎ गोविंददेवगिरी महाराज यांनी केले.‎ हिंद सेवा मंडळ या वर्षी स्थापनेचे‎ शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. या‎ निमित्त आयोजित सोहळ्यात शताब्दी‎ महोत्सवाचा शुभारंभ व लोगोचे‎ अनावरण गोविंददेवगिरी महाराज‎ यांनी रिमोटद्वारे केले.

तसेच रामकरण‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सारडा विद्यार्थी गृहात नव्याने‎ उभारलेल्या बंकटलाल पेमराज‎ सारडा कला मंदिराचे उद्घाटनही‎ त्यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी‎ संस्थेचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक होते.‎ यावेळी प्रमिलादेवी सारडा, रामकरण‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सारडा विद्यार्थी गृहाचे चेअरमन‎ श्यामसुंदर सारडा, मानद सचिव‎ संजय जोशी, कार्याध्यक्ष ॲड. अनंत‎ फडणीस, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित‎ बोरा, प्रोजेक्ट चेअरमन मधुसूदन‎ सारडा आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...