आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीहंडी:हिंदसेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ज्ञानरूपी दहीहंडी फोडली

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधाच्या आकर्षक वेशभूषा केल्या होत्या.शाळेतील दहीहंडी विविध प्रश्नांच्या चिठ्ठ्या टाकून ठेवल्या होत्या. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी एक एक चिठ्ठी काढून प्रश्नाचे उत्तर दिले. विद्यार्थ्यांना शाळेतर्फे चेअरमन मधुसूदन सारडा व स्मिता सारडा यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. दहीहंडी उत्सव हा सर्वत्र साजरा केला जातो.

दहीहंडी उत्सवातून मुलांना आनंद व शिक्षण दोन्ही मिळावेत. यासाठी ज्ञानरूपी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते, असे मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांनी सांगितले. गोविंदा आला रे आला,मच गया शोर सारी नगरी रे या गाण्यांच्या ठेक्यावर विद्यार्थ्यांनी ताल धरला. चौथीच्या विद्यार्थ्यांनी झांज पथकाद्वारे उपस्थित सर्वांची मने जिंकली.

बातम्या आणखी आहेत...