आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब याला फाशीची शिक्षा व्हावी. लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी येत्या १४ डिसेंबरला नगर शहरात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या मोर्चात कालीपुत्र कालीचरण महाराज व काजल दीदी हिंदुस्तानी सहभागी होणार आहेत.
सकाळी ११ वाजता माळीवाडा बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे. दिल्लीगेट येथे मोर्चाची सांगता करण्याचे नियोजन सुरू आहे. शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना या मोर्चाच्या नियोजनात सक्रिय झाल्या आहेत. संपूर्ण नगर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातूनही हिंदू समाजबांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत. नगर शहरातील मोर्चात किमान २५ ते ३० हजार समाजबांधव सहभागी होतील या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले.
मोर्चाला परवानगी नाकारावी : एमआयएम
सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या सभेमुळे शहराची शांतता भंग होणार आहे. त्यामुळे या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारावी, अशी मागणी एमआयएमचे कार्याध्यक्ष मतीन शेख यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.