आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:कुकाण्यात फळबागांना तडाखा‎

कुकाणे‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिसरातील देडगाव, पाचुंदे,‎ तेलकुडगाव, देवसडे, येथे‎ अवकाळी वारा गारपीट व पावसाने‎ शेतकर्‍यांच्या गहू, हरबरा, मका‎ पिकांसह आंबा, डाळिंब, या‎ फळबागांची मोहोर व फळे गळुन‎ शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात‎ नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना‎ नुकसान भरपाई मिळावी, अशी‎ मागणी होत आहे. वादळामुळे‎ आंबा बागांत कैऱ्यांचा सडा पडला.‎ त्याचबरोबर गव्हाचे मोठे नुकसान‎ झाले.

अचानक आलेल्या गारंच्या‎ पावसामुळे बळीराजांची मोठी‎ तारंबळ उडाली. शेतकऱ्यांना‎ नुकसान भरपाई मिळावी, अशी‎ मागणी जेऊर हैबतीचे सरपंच‎ महेश म्हस्के यांनी केली आहे. दोन‎ तीन दिवसांपासून सुरू असलेल्या‎ वादळी वारे, पाऊस व गारपीटीने‎ आंबामोहोरचे व डाळिंब बहाराचे‎ प्रचंड नुकसान झाले आहे.‎ अतिवृष्टीमुळे नेवासे तालुक्यातील‎ फळबागेचे प्रचंड नुकसान झाले‎ होते.

त्याचे पंचनामे केले होते मात्र‎ अजून नुकसान भरपाई मिळाली‎ नाही. त्यामुळे नेवासा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तालुक्यातील फळबागेला‎ कोणत्याही प्रकारची शासकीय‎ मदत मिळाली नव्हती. आता‎ देखील अवकाळी वादळ वारे‎ गारपीटीने झालेल्या फळबागांचे‎ तात्काळ पंचनामे करावी, अशी‎ मागणी ठाकरे गट सेनेचे‎ तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के यांनी‎ केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...