आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड योद्ध्यांचा सन्मान ; कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन

संगमनेर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिसानिमित्त मंगळवारी शहरातील पडतानी कॉम्प्लेक्सच्या सभागृहात मनसे पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबीर व कोविड योद्धा कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते. रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया होते. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शरद गोर्डे, डॉ. अमोल कर्पे, तालुकाध्यक्ष अशोक शिंदे, शहराध्यक्ष तुषार ठाकुर, दिपक वर्पे, तुषार बढे व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

कोरोना महामारीत जिवाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार करणारे डॉ. संदीप कचेरिया, डॉ. अमोल कर्पे, डॉ. प्रदीप कुटे, डॉ. रवी साबळे, डॉ. सचिन वाळे, डॉ. उदय जोशी, डॉ. वैभव जोंधळे, पत्रकार गोरख नेहे, विनोद पाळंदे, सुशांत पावसे, मोफत जेवण पुरविणारे बजरंग दलचे सचिन कानकाटे, गोपाल राठी, विशाल वाकचौरे, भाजयुमोचे कल्पेश पोगुल, जग्गू शिंदे यांचा कोविड योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. डॉ. कचेरीया, कर्पे, वाळे, साबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

तालुक्यात महिनाभर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच वृक्षारोपण करणार असल्याचे शरद गोर्डे यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन दिपक वर्पे यांनी केले. तर तुषार बढे यांनी सर्वांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...