आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:आदर्श ग्रामविकास अधिकारी सुदामराव बनसोडे यांचा सेवानिवृत्तीबद्दल गौरव

नेवासेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुदामराव बनसोडे यांनी ज्ञानदानासह ग्रामसेवेचे केलेले पवित्र कार्य, हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार श्रीक्षेत्र देवगडचे भास्करगिरी महाराज यांनी केले.

नेवासे तालुक्यातील आदर्श ग्रामविकास अधिकारी सुदामराव बनसोडे हे ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यावेळी श्रीक्षेत्र देवगड येथील कल्याण सभामंडपात झालेल्या सेवापूर्ती गौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्करगिरी महाराज हे होते. सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे उद्धव महाराज मंडलिक, क्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानच्या विश्वस्त कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी ग्रामसेवक संघटनेचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब भांड यांनी प्रास्ताविक केले. प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांनी संत महंतांसह आलेल्या प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी ३१ वर्षांच्या उत्कृष्ट सेवाकार्याबद्दल ग्रामविकास अधिकारी सुदामराव बनसोडे व रत्नमाला बनसोडे यांचा गुरुवर्य भास्करगिरी महाराज व उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...