आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:गोदावरी अर्बन पाथर्डी शाखेकडून कर्तृत्वान ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

पाथर्डी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैशाची बचत ही भविष्यात प्रत्येकालाच मोठा आधार ठरत असते. यासाठी कुठल्याही क्षेत्रातील व्यक्ती असो प्रत्येकाने आर्थिक बचतीतून आपल्या जीवनाची प्रगती साधावी, असे आवाहन गोदावरी अर्बनचे शाखा अधिकारी बालाजी खराटे यांनी केले. गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, मॅनेजर महेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील निवृत्त शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, निवृत्त अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शंकर रासने, विश्वनाथ खेडकर, महादेव सोनवणे, दयानंद जिरेसाळ, रतिलाल पटवा, रामनाथ परदेशी, सविता पंडित, विलास रोडी, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रूपाली पालवे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...