आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा नेवासे महिला मंच व भाजप महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून नेवासे फाटा येथे रविवारी सायंकाळी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिलानी सहभाग घेतला. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. दीप प्रज्वलन माजी जिल्हा परिषद सदस्य आशा मुरकुटे, भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष डॉ. निर्मला सांगळे व डॉ. विद्या कोलते यांच्या हस्ते करण्यात आले. विविध क्षेत्रात अग्रगण्य कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान जय हरी महिला प्रतिष्ठानच्या वतीने आशा मुरकुटे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, शेती, कुस्ती, कबड्डी या क्षेत्रात आपले नावलौकिक करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
कुस्तीसारख्या मर्दानी खेळातही नेवासे तालुक्यातील महिला मागे नाहीत, राष्टीय पातळीवर सानिका पवार सुवर्णपदक, धनश्री नवथर राज्यपातळीवर रौप्यपदक मिळवले, त्यांचा सन्मान या वेळी करण्यात आला. यावेळी त्यांना मार्गदर्शक करणारे आंतरराष्ट्रीय पंच निकाळजे यांचाही सन्मान केला. त्यानंतर महिलांनी आपापले कलागुणानुसार, कथक, लावणी व विविध गाण्यांवरील नृत्य सादर केले. त्यानंतर खेळ पैठणीचा या विविध स्पर्धा होऊन विजेत्यास सर्व महिलांना पैठणी भेट देण्यात आली. कार्यक्रमात नेवासे तालुक्यातील कौठा येथील महिला कीर्तनकार योगेश्वरी दरंदले यांनी भेट देऊन महिलांसाठी प्रबोधनपर विचार मांडले. स्पर्धकांचे बक्षीस वितरण सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. ज्या महिलांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांनाही आयोजककडून बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रताप चिंधे, भाजपचे तज्ञ मार्गदर्शक डॉ. बाळासाहेब कोलते, सलमान शेख, किशोर जाधव, आर्यन कोलते, वसंत काळे, भाजपचे सोशल मीडियाचे तालुका संयोजक आदिनाथ पटारे, कृषी मित्र भागवत खराडे, हरीश गाडेकर, आकाश पवार आदी यावेळी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.