आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ अहमदनगर मनपा शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान एकल महिलांचा सन्मान करण्यात आला.विविध कारणांनी आपले पती गमावलेल्या पण पतीच्या निधनानंतर भक्कमपणे सर्व संकटांचा यशस्वीपणे मुकाबला करत आपल्या घराला व मुलांना उभे करणाऱ्या एकल महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे हे हाेते, तर महापौर रोहिणी शेंडगे,मनपा कर्मचारी युनियन अध्यक्ष अनंत लोखंडे, प्रशासनाधिकारी भाऊसाहेब थोरात, पर्यवेक्षक जुबेर पठाण, संध्या पांडे, डॉ. सोनाली खांडरे, एकल महिला पुनर्वसन जिल्हाध्यक्ष अशोक कुटे, नंदेश शिंदे, प्रकाश इथापे, दत्तात्रय उरमुडे, अरुण पवार, मनिषा शिंदे, राज्य संघटक भाऊसाहेब कबाडी, राज्य संपर्क प्रमुख अमोल बोठे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मनपा शिक्षण विभागात कार्यरत महिला शिक्षिकांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. क्षितीजा हडप,रुबीना शेख,मंगल ससे,आशा साठे,अनिता नवले, सोनाली तिवारी, रुपाली कोल्हे,मेघा वरखेडकर, हर्षदा दिवटे, अंजली चौधरी, सुनिता शिंदे,उषा बनगे या एकल महिलांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.