आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव साजरा:एकल महिलांचा साडीचाेळी देऊन सन्मान ; ऑटो रिक्षा व टेक्सी संघटनेच्या वतीने आयोजित

कोपरगाव शहर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने संस्थापक राजेंद्र झावरे, अध्यक्ष कैलास जाधव, उपाध्यक्ष पत्रकार राजेंद्र सालकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. कोरोनामुळे व इतर कारणांमुळे एकल (विधवा) झालेल्या महिलांना आरतीचा मान देत या एकल महिलांच्या हस्ते आरती करत या सर्व महिलांचा साडी चोळी देत कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टेक्सी संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी कोपरगाव तालुका ऑटोरिक्षा संघटनेचे संस्थापक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, अध्यक्ष उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, उपाध्यक्ष पत्रकार राजेंद्र सालकर, शहर प्रमुख कलविंदर दडियाल, माजी शिवसेना शहर प्रमुख अस्लम शेख, प्रकाश शेळके, भाऊसाहेब जाधव, विक्रांत झावरे, सागर जाधव, सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सांगीता मालकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...